अध्यात्म कि बाते
अध्यात्म म्हणजे काही विशिष्ट सराव किंवा साधना नव्हे.
तो आपल्या अस्तित्वाचा एक निश्चित असा मार्ग आहे. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. हे आपल्या घरातील बागेसारखे आहे. जर माती, सूर्यप्रकाश आणि रोप उत्तम स्थितीत नसतील, तर त्याला फुले येणार नाहीत, आणि तुम्हाला त्यासाठी काहीतरी करावे लागेल.
तुम्हाला त्या सर्व गोष्टींची सुव्यवस्था आणि काळजी घ्यावी लागेल. तर तुम्ही तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा यांना एका विशिष्ट पातळीपर्यन्त परिपक्व केलीत, तर तुमच्यामध्ये काहीतरी अदभूत असे फुलून येईल – हेच अध्यात्म आहे. जेंव्हा तुमचा तर्क अपरिपक्व असतो, तेंव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर शंका घेता. जेंव्हा तुमचा तर्क परिपक्व होतो, तेंव्हा तुम्ही सर्वकाही संपूर्णपणे वेगळ्याच दृष्टीकोणातून पाहायला सुरुवात करता.
नाही, हे फक्त जीवन आहे. मी जेंव्हा “फक्त जीवन” असे म्हणतो, तेंव्हा मी ती एक छोटी तुच्छ गोष्ट म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत नाही. ही एक सर्वात महान गोष्ट आहे. जेंव्हा जीवन तुमच्यासाठी एक जबरदस्त, शक्तीशाली, आनंददायी अनुभव बनते, तेंव्हाच याची निर्मिती कुणी केली असेल हे जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होते.
जर तुम्हाला सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया किंवा स्रोत जाणून घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी तुम्हाला सर्वात निकटचा निर्मितीचा भाग म्हणजे तुमचे आपले शरीर आहे, नाही का? तुमच्या स्वतःमध्येच दडलेला तो सृष्टीकर्ता, तुमच्यातच अडकून बसलेला आहे. तुम्ही त्याला मुकु नये. तुम्ही त्याला या ठिकाणी गाठले, तुम्हाला तुमच्यामधील सृष्टी रचनेचा स्रोत गवसला, तर तुम्ही आध्यात्मिक आहात.
अध्यात्म माणसाला देवाशी जोडण्याचा एक भक्ती मार्ग आहे .अध्यात्माने माणसाला विज्ञान तंत्रज्ञान गणित व इतर विषयांची जोडणारे ज्ञान दिले.
हे सर्व ज्ञान श्रीमद् भगवद्गीता, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आयुर्वेद व इतर अनेक ग्रंथ यांमधून मिळते.रामायण महाभारत अशा सर्व कथा द्वारे आपल्याला देवाचे वास्तव्य समजते.
ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे आणि तोच या जगाचा चालक मालक पालक आहे.
ज्याप्रमाणे आपल्यालाही वाटतं की 'जर आपला संपर्क प्रत्यक्ष राष्ट्रपती किंवा पंतप्रधान त्यांच्याशी असला तर आपण किती नशीबवान असू ' त्याचप्रमाणे जर आपला संपर्क थेट देवाशी जोडायचा असेल तर तो ग्रंथ पठण आकलन व आचरण याद्वारे व श्लोकांद्वारे जोडू शकतो.
हे तर अति अति अत्यल्प ज्ञान आहे सविस्तर माहितीसाठी भगवत गीता व ग्रंथ वाचा
देवावर तुमचा विश्वास असणे हे आध्यात्मिकतेचे लक्षण आहे का?
एखादी नास्तिक व्यक्ती आध्यात्मिक असू शकत नाही, पण एक आस्तिक व्यक्तीदेखील अध्यात्मिक असू शकत नाही. कारण नास्तिक आणि आस्तिक हे दोघे वेगळे नाहीत.
एक म्हणतो देव आहे, आणि दुसरा म्हणतो देव नाही. दोघेही अशा गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत, ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती, अनुभव नाही. तुम्हाला माहित नाही हे मान्य करण्यायेवढे तुम्ही प्रामाणिक नाही, पण ही समस्या तुमचा आहे.
तर आस्तिक आणि नास्तिक यांच्यात काही फरक नाही. वेगवेगळे आहोत असे भासविणारी ती एक सारखीच माणसे आहेत. अध्यात्माची आस असणारी व्यक्ती आस्तिक देखील नसते, किंवा नास्तिक देखील नसते. आपल्याला माहित नाही हे त्याला समजलेले असते, म्हणूनच ज्ञानप्राप्तीच्या शोधात आहे.
ज्या क्षणी तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, तेंव्हा तुम्ही इतर गोष्टींप्रती आंधळे होता. या पृथ्वीवर सुरू असलेला संपूर्ण संघर्ष हा तुम्हाला भासाविल्याप्रमाणे बरं आणि वाईट यांच्यामधील नाही. तो नेहमीच एका मनुष्याच्या विश्वास आणि धारणां विरुद्ध दुसर्या मनुष्याच्या विश्वास व धारणा असा असतो.
विश्वास, धारणांची गरज आध्यात्मिक कारणांपेक्षा मानसिक कारणांसाठी अधिक असते. तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीला कवटाळून बसायचे असते, तुम्हाला सुरक्षित असावेसे वाटते, आपल्याला सर्वकाही माहित आहे असा पोकळ आत्मविश्वास हवा असतो. हे सर्व एका अतिशय बालिश मनातून येत आहे. या अस्तित्वाबद्दल तुम्हाला काहीही माहित नसले तर काय अडचण आहे, वास्तविकतः तुम्हाला खरेच काही माहिती नाही. हे खूप सुंदर आहे! आणि तुम्ही स्वतःला आतून सुंदर आणि आनंदी कसे बनवायचे हे पहा, ते तुमच्याच हातात आहे.



Comments
Post a Comment